Ukhane In Marathi For Female लग्नातील नवरीचे मराठी उखाणे बायकांचे उखाणे लिहिलेले उखाणे, चांगले उखाणे, कॉमेडी सोपे उखाणे : Bride Ukhane Marathi आम्ही आपल्या करीता भरपूर उखाणे या लेखात उपलब्ध करून दिले आहे . लग्न प्रसंगात किवा इतरही मनोरंजन करण्या करिता आपण या लेखातील उखाणे वाचू शकता. परंतु मी आपल्याला सांगू इच्चीतो कि या लेखात जास्तीत जास्त उखाणे नावरीकरिता आहे. याशिवाय जर आपल्याला कॉमेडी म्हणजेच विनोदी उखाणे जर हवे असनार ते तुम्ही आमचे इतरही आर्टिकल बघू शकता. त्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे उखाणे आपल्या करीत उपलब्ध करून दिले आहे. खालील उखाणे लग्न किंवा पूजा प्रसंगी आपण वापरात आणू शकता. लग्नाचे उखाणे, लिहिलेले उखाणे, Bride Ukhane Marathi चांगले उखाणे, Navriche Ukhane Marathi नवरीचे उखाणे सोपे, लग्नातील उखाणे मराठी उखाणे, बायकांचे उखाणे, उखाणे मराठी नवरीचे, लिहिलेले उखाणे, चांगले उखाणे, सोपे उखाणे, मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश, कॉमेडी उखाणे, विनोदी उखाणे, नावाचे उखाणे
अनुक्रमणिका:
- 1 Ukhane In Marathi For Female लग्नातील उखाणे मराठी उखाणे
- 2 Marathi Ukhane For Female लग्नातील मराठी उखाणे
- 3 Ukhane In Marathi बायकांचे उखाणे लग्नातील मराठी उखाणे
- 4 Ukhane Marathi For Female मराठी उखाणे नवरी साठी
- 5 Ukhane In Marathi For Female उखाणे मराठी नवरीचे
- 6 Funny Ukhane In Marathi For Female लग्नाचे उखाणे
- 7 Marathi Ukhane For Female Romantic लिहिलेले उखाणे
- 8 Bride Ukhane Marathi चांगले उखाणे
- 9 Navriche Ukhane Marathi नवरीचे उखाणे सोपे
- 10 लग्नातील उखाणे मराठी उखाणे Ukhane In Marathi For Female
- 11 लग्नातील मराठी उखाणे Marathi Ukhane For Female
- 12 बायकांचे उखाणे लग्नातील मराठी उखाणे Ukhane In Marathi
- 13 मराठी उखाणे नवरी साठी Ukhane In Marathi For Female
- 14 उखाणे मराठी नवरीचे Navriche Ukhane Marathi
- 15 लग्नाचे उखाणे Ukhane Marathi For Female
- 16 लिहिलेले उखाणे Marathi Ukhane For Female Romantic
- 17 चांगले उखाणे Ukhane For Female Romantic
- 18 नवरीचे उखाणे सोपे Bride Ukhane Marathi
- 19 मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश Ukhane In Marathi For Female
- 20 विनोदी उखाणे Funny Ukhane In Marathi For Female
- 21 नवीन उखाणे Navin Marathi Ukhane
- 22 नावाचे उखाणे सोपे Ukhane In Marathi For Female
- 23 चांगले उखाणे सोपे Ukhane In Marathi For Female
- 24 सोपे उखाणे मराठी कॉमेडी Ukhane In Marathi For Female
- 25 Funny Marathi Ukhane विनोदी उखाणे
- 26 Satyanarayan Pooja Ukhane In Marathi सोपे उखाणे
- 27 Marathi Ukhane For Wife नावाचे उखाणे
Ukhane In Marathi For Female लग्नातील उखाणे मराठी उखाणे
- गुलाबाचे फुल दिसायला ताजे,( पतीचे नाव……) रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
- गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,( पतीचे नाव……) रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
- गुलाबाचे फुल छान वाटते, मुलींच्या केसावर,( पतीचे नाव……) रावांचे नाव सदैव, माझ्या ओठावर.
- आई-वडिलांना इंग्लिश मध्ये बोलतात, पप्पा आणि मम्मी,( पतीचे नाव……) तुमची साथ हवी, सात जन्मी.
- ७ ला म्हणतात, इंग्रजीमध्ये सेवन, ( पतीचे नाव……) रावांसाठी शिकेन, मी सर्व जेवण.
- आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे, ( पतीचे नाव……) रावांसाठी, सोडून आले मी सारे.
- हिमालय पर्वतावरून, नदी वाहते कलिका, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, मी पाटलांची बालिका.
- तलावात उगवतात सुंदर कमळ, ( पतीचे नाव……) रावांच नाव घेते, आहेत खूप प्रेमळ.
- कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, ( पतीचे नाव……) चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
- नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल, ( पतीचे नाव……) रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.
- दादरला गेलो बांधायला, लग्नाचा बस्ता, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.
- जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.
Marathi Ukhane For Female लग्नातील मराठी उखाणे
- कोशिंबीर बनवण्यासाठी, कांदे ठेवले कापून, ( पतीचे नाव……) रावंच नाव घेते, सर्वांचा मान राखून.
- यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, ( पतीचे नाव……) सोबत सुखी आहे सासरी.
- संस्कृत भाषेमुळे, सर्व भाषा झाल्या तयार, ( पतीचे नाव……) रावांचे इंग्रजी ऐकून, झाले मी घायाळ.
- लग्नाच्या आधी, बांधला नवीन बंगला, ( पतीचे नाव……) रावांच्या प्रपंचात, जीव माझा रंगला.
- सासू सासऱ्यांच्या छायेत, मला नाही काही कमी, ( पतीचे नाव……) राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.
- गणपती बाप्पाचे, चरण स्पर्श करते खाली वाकून, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून.
- आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया, ( पतीचे नाव……) रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.
- द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, ( पतीचे नाव……) चे नाव घेतो ऐका देऊन कान.
- शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, सागर ची आई.
- इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात, ( पतीचे नाव……) रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत.
हे सुद्धा वाचा:
- श्री. मोरारजी देसाई यांची संपूर्ण माहिती
- 200+ नवरीचे नवीन मजेदार उखाणे
- माझा आवडता खेळ निबंध
- संत तुकाराम महाराज माहिती मराठी
Funny Marathi Ukhane विनोदी उखाणे, Satyanarayan Pooja Ukhane In Marathi सोपे उखाणे, Marathi Ukhane For Wife नावाचे उखाणे
Ukhane In Marathi बायकांचे उखाणे लग्नातील मराठी उखाणे
- चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप, ( पतीचे नाव……) रावांसाठी केले, ५ वर्ष तप.
- केळीचं पान टरटर फाटतं, ( पतीचे नाव……) ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.
- कामाला आहेत हे, भारताच्या बाहेर, ( पतीचे नाव……) रावांसाठी सोडून, आले मी माहेर.
- महाराष्ट्रात असावे, मराठी भाषेचे वर्चस्व, ( पतीचे नाव……) राव आहेत, माझे सर्वस्व.
- नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार, ( पतीचे नाव……) रावांचा स्वभाव आहे फारच उदार.
- संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,माझी ( पत्नीचे नाव…… ) म्हणते मधुर गाणी.
- अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,( पत्नीचे नाव…… ) हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.
- जन्मात एक झाली, हि प्रितभेट देवा, ( पतीचे नाव……) राव मला साथ जन्मी, तुमचीच पत्नी ठेवा.
- सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे, ( पतीचे नाव……) रावांना दान दिले, मला जन्माचे.
- कोणीतरी आठवण काढत होते, म्हणून मी शिंकले, ( पतीचे नाव……) रावांचे मन, मी पहिल्या भेटीतच जिंकले.
- पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, ( पतीचे नाव……) रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार.
- मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर, ( पतीचे नाव……) यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
Ukhane Marathi For Female मराठी उखाणे नवरी साठी
- लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,अखेर , ( पतीचे नाव……) रावांशी बांधली, लग्नाची गाठ.
- बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड, ( पतीचे नाव……) रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड.
- भिल्लीणीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा , ( पतीचे नाव……)च्या सोबत आज पहिली सत्यनारायणाची पूजा.
- चांदीच्या नक्षीदार ताटाला, सोन्याचा गिलावा, ( पतीचे नाव……) रावांसारखा गुणी पती, जन्मोजन्मी मिळावा.
- पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
- मला आवडते, सर्वांची काढायला खोड, ( पतीचे नाव……) रावांचे बोलणे, मधापेक्षा गोड.
- चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेऊन, करते सर्वाना नमस्कार.
- नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, ( पतीचे नाव……)रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
- घालते मी शुभप्रभाती, पाणी तुळशीला, ( पतीचे नाव……) रावांनी मला, बायको करून आणली मुळशीला.
- आई-वडिलांना काळजी होती, कसे मिळेल घर, ( पतीचे नाव……) रावांसारखे, शांत मिळाले वर.
- होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात, घेतात सर्व उखाणे, ( पतीचे नाव……) रावांमुळे माझे, आयुष्य चालले आहे सुखाने.
- आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, ( पतीचे नाव……) राव हेच माझे अलंकार खरे.
हे सुद्धा वाचा:
Ukhane In Marathi For Female, चांगले उखाणे सोपे Ukhane In Marathi For Female, सोपे उखाणे मराठी कॉमेडी Ukhane In Marathi For Female
Ukhane In Marathi For Female उखाणे मराठी नवरीचे
- देवा सारखा पिता, आणि देवी सारखी माता, ( पतीचे नाव……) राव मिळाले, स्वर्ग आला हाता.
- दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी, ( पतीचे नाव……) राव आले आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.
- पैठणीवर शोभे, सुंदर मोरांची जोडी, ( पतीचे नाव……) रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
- जेवणाला चव यायला, लागते मीठ, ( पतीचे नाव……) दिसते घाबरी, पण आहे खूप धीट.
- खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, ( पतीचे नाव……) रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
- शेवटी आज आला, तो आनंदाचा दिवस, ( पतीचे नाव……) रावांसारखे पती मिळावे म्ह्णून, केला होता नवस.
- नको मोहन माळ, नको हिऱ्याचा हार, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवनात, मी सुखी आहे फार.
- हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, ( पतीचे नाव……) रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
- मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती, ( पतीचे नाव……) रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.
- नव्हत्या माहित मला, जन्मातरींच्या गाठी, ( पतीचे नाव……) देवाने बनवलंय तुला, माझ्याच साठी.
- लग्नात बांधला, सर्व पाहुण्यांनी फेटा, ( पतीचे नाव……) रावांच्या संसारात, माझा आहे अर्धा वाटा.
- फुलांचा सुगंध, दरवळला चहूकडे, ( पतीचे नाव……) रावांचे नाव, मोठं होउदे सगळीकडे.
Funny Ukhane In Marathi For Female लग्नाचे उखाणे
- नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण, ( पतीचे नाव……) चं नाव घेते बारशाचं कारण.
- चांदीच्या ताटात ठेवले लाडू, ( पतीचे नाव……)चे नाव घेते सत्यनारायणापुढे .
- रिम झिम झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, राहुद्या लक्षात.
- छान वाटतो नव्या नवरीला, साडीचा रंग हिरवा, ( पतीचे नाव……) आता मला ची सून लवकर बनवा.
- गुणवान पती मिळावा, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा, ( पतीचे नाव……) राव माझ्या, जीवनातील मौल्यवान ठेवा.
- पुण्याला आहे आळंदी , ( पतीचे नाव……) माझ्या आयुष्यात आले, म्हणून आहे मी आनंदी.
- कोकणात आहेत, जंगल घनदाट, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
- शुभमंगल झाले, आणि अक्षता पडल्या माथी, ( पतीचे नाव……) राव आजपासून, माझे जीवनसाथी.
- सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले, ( पतीचे नाव……) रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.
- सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट , ( पतीचे नाव……) यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट.
- देवापुढे मागते, सर्वाना चांगले भेटूदे आरोग्य, ( पतीचे नाव……) रावांच्या रूपात मिळाला, जीवनसाथी योग्य.
- अमरीतसर वरून आणला, हातात घालायला कडा, ( पतीचे नाव……) रावांच्या नावाने भरते, लग्नचुडा.
हे सुद्धा वाचा:
Ukhane In Marathi For Female लग्नातील उखाणे मराठी उखाणे, Marathi Ukhane For Female लग्नातील मराठी उखाणे,
Marathi Ukhane For Female Romantic लिहिलेले उखाणे
- अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो, ( पतीचे नाव……)नी माझी जोडी.
- घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी , ( पतीचे नाव……)चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी .
- फुलासंगे मातीस सुवास लागे, ( पतीचे नाव……)रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.
- करवंदाची साल चंदनाचे खोड, ( पतीचे नाव……) रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.
- एका वर्षात असतात महिने बारा, , ( पतीचे नाव……) च्या नावात समावलाय आनंद सारा.
- नूतन वर्षाचा शुभारंभ करीत, येतो पाडवा, ( पतीचे नाव……) रावांच्या सानिध्यात, राहो सदैव गोडवा.
- आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज, ( पतीचे नाव……) रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
- हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते, ( पतीचे नाव……) राव मला नको अजून काहि, मी फक्त तुमच्यावर मरते.
- स्वप्नातला गुलाब, गालात हसला, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेण्यास, मान कसला.
- आई वडिलांनी केले संस्कार , शिक्षणाने केले सक्षम, ( पतीचे नाव……) सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.
- मोगऱ्याचा सुगंध घेताना, झाले मी धुंद, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद.
- अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे, ( पतीचे नाव……) रावांची राणी.
Bride Ukhane Marathi चांगले उखाणे
- प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची, ( पतीचे नाव……)रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.
- राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, ( पतीचे नाव……) रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार.
- कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी, ( पतीचे नाव……) चं नाव घेते …. च्या बारशाच्या दिवशी.
- नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे, ( पतीचे नाव……)रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
- गावठी गुलाबाला सुगंध सुवास, ( पतीचे नाव……) रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
- वादळ आलं,पाऊस आला,मग आला पूर, ( पतीचे नाव……) हिचं नाव घेतो,भरून तिच्या भांगेत सिंदूर.
- वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, ( पतीचे नाव……) रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
- पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता , ( पतीचे नाव……)रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
- हिरवा चाफा, कमळ निळे, ( पतीचे नाव……) मी सुखी आहे, कारण तुमच्यामुळे.
- अरेंज म्यॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल, याची होती भिती,परंतु , ( पतीचे नाव……) रावांच्या येण्याने, बदलली माझी स्तिथी.
- वडिलांची छाया, आईची माया, ( पतीचे नाव……) रावांच्या सुखासाठी, झिजवते काया.
- श्लोक रामदासांचे, आहेत किती छान, ( पतीचे नाव……) रावांच्या संसारात, हरवले मी भान.
हे सुद्धा वाचा:
Ukhane In Marathi बायकांचे उखाणे लग्नातील मराठी उखाणे, Ukhane Marathi For Female मराठी उखाणे नवरी साठी,
- सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, ( पतीचे नाव……)रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले.
- रखरखत्या वैशाखात, प्रेमाचा धुंद वारा,जीवनाचा खेळ समजला, , ( पतीचे नाव……) मुळे सारा.
- सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत, दाराच्या अंगणात, ( पतीचे नाव……) रावांसोबत संसार फुलवेल, आनंदाच्या वृंदावनात.
- खूप संकट आले, पावलो पावली, ( पतीचे नाव……) रावांच्या घरात, अखेर भेटली मला सावली.
- प्रेम काय आहे, हे माहित नव्हते मला,ते खूप सुंदर आहे, हे , ( पतीचे नाव……) रावांमुळे कळले मला.
- दारा वरती काढली, लक्ष्मीची पावल, ( पतीचे नाव……) रावांचे साधे रूप, माझ्या मनाला भावल.
- हळद लावण्यासाठी, बसली मी पाटावर, ( पतीचे नाव……) रावांच नाव काढलंय, मेहंदीने हातावर.
- परिवार खुश राहील, जोडून नाती घट्ट, ( पतीचे नाव……) पुरवतील आता, माझा सर्व हट्ट.
- माहेर सोडून येताना, डोळ्यात होते आसू, ( पतीचे नाव……) रावांच्या प्रेमळ संसारात, ओठावर असतं हासू.
- रात्रीच्या आकाशात, चमचमते तारे, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.
- सासरे आहेत प्रेमळ, सासूबाई आहेत दयाळू, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, आहेत खूप मायाळू.
- ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.
लग्नातील उखाणे मराठी उखाणे Ukhane In Marathi For Female
- केस माझे कुरळे, सावली पडली गालावर, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, मैत्रिणींच्या बोलावर.
- चांदीची जोडवी, पतीची खूण, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, आजपासून झाली _घराण्याची सून.
- गुलाबाचे फुल, गणपती बाप्पाला वाहिले, ( पतीचे नाव……) च्या साठी, गाव पाहिले.
- प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात, ( पतीचे नाव……)रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.
- शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,आता , ( पतीचे नाव……)राव माझे जीवनसाथी.
- भल्या पहाटे करावी देवाची पूजा, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवावर करते मी मजा.
- संत्री ला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज, ( पतीचे नाव……) आणि माझे झाले लव्ह मॅरेज.
- चला सगळे घरी, संपली आमची वरात, ( पतीचे नाव……) रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते घरात.
- कोकणाला जाताना, लागतो आंबा घाट, ( पतीचे नाव……) रावांच नाव घेते, सोडा माझी वाट.
- इंग्रजीत म्हणतात मून, चंं नाव घेते , ( पतीचे नाव……) ची सून.
- चालली सप्तपदीचे, सात पावले, ( पतीचे नाव……) रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.
- अलिबागला जाताना , मज्जा येते होडीने, ( पतीचे नाव……) घरात प्रवेश करू जोडीने.
हे सुद्धा वाचा:
Ukhane In Marathi For Female लग्नातील उखाणे मराठी उखाणे, Marathi Ukhane For Female लग्नातील मराठी उखाणे, Ukhane In Marathi बायकांचे उखाणे लग्नातील मराठी उखाणे, Ukhane Marathi For Female मराठी उखाणे नवरी साठी,
लग्नातील मराठी उखाणे Marathi Ukhane For Female
- प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी, ( पतीचे नाव……) रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी.
- पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे.
- हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा, ( पतीचे नाव……) रावांना घास घालायला वेळ कशाला हवा.
- स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली उडी, ( पतीचे नाव……) रावांच्या नावाने घालते गळ्यात, मंगळ सूत्राची जोडी.
- नव्या नवरीचा आज उतरला साज, खऱ्या अर्थाने गृहिणी , ( पतीचे नाव……) रावांची झाले आज.
- श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,आमच्या , ( पतीचे नाव……) आवडतो गरमगरम बटाटेवडा.
- पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा आहेत चार, ( पतीचे नाव……) रावांनी घातला गळ्यात, मंगळसूत्राचा हार.
- जेव्हा भगवान भोलेनाथ चा, बुलावा येईल,तेव्हा , ( पतीचे नाव……) ला सोबत, केदारनाथ ला घेऊन जाईल.
- संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
- सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ( पतीचे नाव……) चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
- आकाशातून पडतो, तुटता तारा, ( पतीचे नाव……) मध्ये आहे, माझा जीव सारा.
- आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी, ( पतीचे नाव……) च नाव घेतो, राम कृष्ण हरी.
बायकांचे उखाणे लग्नातील मराठी उखाणे Ukhane In Marathi
- पंढरीच्या यात्रेत, विठ्ठल नामाचे गजर, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर.
- कोकणातील जंगले आहेत, सुंदर आणि घनदाट, ( पतीचे नाव……) रावांसोबत बांधली अखेर, लग्नाची जीवनगाठ.
- मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, ( पतीचे नाव……) भाव देत नाही किती केले ट्राय.
- सर्व कार्याचा पाठीराखा, विघ्णहर्ता गणेश, ( पतीचे नाव……) राव हेच माझ्या, जीविताचे परमेश.
- ताटभर दागिन्यांपेक्षा, माणसं असावी घरभर, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा जन्मभर.
- सर्वांच्या नावाप्रमाणे, वेगवेगळ्या आहेत राशी, ( पतीचे नाव……) रावांचे चरण, हीच माझी अयोध्या काशी.
- मंडप सजवण्यासाठी, आणली छान छान फुले, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.
- डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ( पतीचे नाव……) रावांच्या नावाने कुंकू लावते लाल.
- सोन्याच्या बेसरीत, पाचूचा खडा, ( पतीचे नाव……) राव अन माझा, ७ जन्माचा जोडा.
- सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
- यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ( पतीचे नाव……)चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
- गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते ______ ची सून.
हे सुद्धा वाचा:
Ukhane In Marathi For Female उखाणे मराठी नवरीचे, Funny Ukhane In Marathi For Female लग्नाचे उखाणे,
मराठी उखाणे नवरी साठी Ukhane In Marathi For Female
- येवले चहा म्हणजे, प्रेमाचा, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, मान राखुन सर्वांचा.
- कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी, ( पतीचे नाव……) याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.
- लग्नकार्य हा आयुष्यातील एक, महत्वाचा भाग आहे, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सदैव असाच राहे.
- कपाळावर कुंकू, जसा चंद्रकोर चा ठसा, ( पतीचे नाव……) रावांच नाव घेते , सर्वजण बसा.
- चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची, ( पतीचे नाव……) रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
- पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी.
- आकाशात दिसतात, निळे निळे ढग, ( पतीचे नाव……) सोबत फिरेन मी, संपूर्ण जग.
- समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, ( पतीचे नाव……)राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.
- जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला, ( पतीचे नाव……) च्या नावाला.
- लग्नासाठी सोडून, आले मी माहेर, ( पतीचे नाव……) आहेत माझ्या, सौभाग्याचा आहेर.
- अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, ( पतीचे नाव……) ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
- अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर, ( पतीचे नाव……) रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर.
- चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती, ( पतीचे नाव……)रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.
- दासांचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेऊन करते, तुम्हा सर्वांना वंदन.
- आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी, ( पतीचे नाव……) चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
- चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, ( पतीचे नाव……) चं नाव घेते देवापुढे.
- लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रद्धेचे बळ, ( पतीचे नाव……) रावांच्या संसारी दे, समृद्धीचे फळ.
- संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन, ( पतीचे नाव……) रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.
- मंगळसुत्रात असतात ,काळे मणी, ( पतीचे नाव……) राव आहेत, माझे धनी.
- शेतामध्ये पावसात, नाचत होता मोर, ( पतीचे नाव……) रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर.
- जीवनात सदैव आई वडिलांचा, आशीर्वाद असावा पाठी, ( पतीचे नाव……) रावांसारखे पती मिळावे, साथ जन्मा साठी.
- देवाच्या देवळात, गोड सनई वाजते,तुमच्या आशीर्वादाने, , ( पतीचे नाव……) रावांचे नाव, महाराष्ट्रात गाजते.
- मखमली हिरवळीवर, पाखरांचा थवा, ( पतीचे नाव……) रावांच्या वंशात, लावीन दीप नवा.
- फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ( पतीचे नाव……)च्या नादाने झालो मी बेभान.
हे सुद्धा वाचा:
Marathi Ukhane For Female Romantic लिहिलेले उखाणे, Bride Ukhane Marathi चांगले उखाणे, Navriche Ukhane
लग्नाचे उखाणे Ukhane Marathi For Female
- तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट, ( पतीचे नाव……) पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट.
- यमुना नदीवर पडली, ताजमहालाची सावली, ( पतीचे नाव……) रावांची जन्मदाती, धन्य ती माउली.
- रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन, ( पतीचे नाव……) च्या साथीने आदर्श संसार करीन.
- गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी, ( पतीचे नाव……)रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
- लग्नानंतर सर्व स्त्रिया, होतात जबाबदार, ( पतीचे नाव……) राव दिसतात, फारच रुबाबदार.
- हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ( पतीचे नाव……) चं नाव घेते ….च्या बारशाच्या दिवशी.
- मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, ( पतीचे नाव……) बरोबर संसार करीन सुखाचा.
- संगमरवरी देवळात बसविली, साईंची मूर्ती, ( पतीचे नाव……) रावांशी लग्न झाले, झाली इच्छा पूर्ती.
- संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.
- सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा.
- पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते.
- चांदीच्या ताटात, कंदीचे पेढे, ( पतीचे नाव……) च नाव घेते देवापुढे.
लिहिलेले उखाणे Marathi Ukhane For Female Romantic
- सर्जेराव पाटलांची, आहे मी लेक, ( पतीचे नाव……) आहेत माझे, एकुलते एक.
- ऊन पावसात कष्ट करून, पिकवलं शेतात सोन, ( पतीचे नाव……) राव हेच माझ्या, सौभाग्याच लेणं.
- स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी, ( पतीचे नाव……)रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी
- मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून , ( पतीचे नाव……)रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून.
- कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, ( पतीचे नाव……)राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती.
- घातली मी वरमाला हसले , ( पतीचे नाव……) राव गाली,थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
- सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ, ( पतीचे नाव……) रावांच्या मांडीवर ______ घेते झोप.
- रायगडावर केले मी, शिवरायांचे दर्शन, ( पतीचे नाव……) रावांच्या प्रेमासाठी, संपूर्ण जीवन अर्पण.
- पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी .
- स्त्रियांनी नवस केला, पती मिळावा सत्यवान, ( पतीचे नाव……) राव भेटले म्हणून, आहे मी भाग्यवान.
- नवा छंद, नवा ध्यास, शोधी नवे आकाश, ( पतीचे नाव……) रावांमुळे माझ्या, आयुष्यात पडला प्रकाश.
- पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं, ( पतीचे नाव……)रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन.
हे सुद्धा वाचा:
Marathi नवरीचे उखाणे सोपे, लग्नातील उखाणे मराठी उखाणे Ukhane In Marathi For Female, लग्नातील मराठी उखाणे Marathi Ukhane For Female, बायकांचे उखाणे लग्नातील मराठी उखाणे Ukhane In Marathi, मराठी उखाणे नवरी साठी
चांगले उखाणे Ukhane For Female Romantic
- श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन.
- दोन जीवांचे, जातक जुळले, ( पतीचे नाव……) रावांमुळे सुख काय आहे, ते कळले.
- तुमच्या सर्वांच्या साक्षीने, घेतला हातात हात, ( पतीचे नाव……) रावांची लागली मला, सात जन्मासाठी साथ.
- लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.
- अलिबाग चा बीच, छान आहे फिरायला, ( पतीचे नाव……) लग्नानंतर जाऊ आपण, एकविरा आईचे दर्शनाला.
- आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर पाहिजे जिद्द, ( पतीचे नाव……) रावांसोबत राहून करेन, संपूर्ण स्वप्न सिद्ध.
- हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत.
- जडतो तो जीव, लागते ती आस, ( पतीचे नाव……) रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.
- लग्न आटपले, आणि काढली वरात, ( पतीचे नाव……) सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.
- बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।, ( पतीचे नाव……)रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
- कपाळाचे कुंकू, जशी चंद्राची कोर, ( पतीचे नाव……) च्या मदतीवर, सगळा माझा जोर.
- पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते ______च्या अंगणात.
नवरीचे उखाणे सोपे Bride Ukhane Marathi
- लग्नात लागतात हार आणि तुरे, , ( पतीचे नाव……)च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
- आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, ( पतीचे नाव……) चं नाव घेते कुंकू लावून.
- मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले, ( पतीचे नाव……) रावांचे हेच रूप मला फार आवडले.
- भजन करताना लागते टाळ, ढोलकी आणि विना, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, जय महाराष्ट्र म्हणा.
- लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव, ( पतीचे नाव……) च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
- श्रीमंत असोवा गरीब असो, स्त्रियांना आवडते माहेर, ( पतीचे नाव……) रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर.
- प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले, ( पतीचे नाव……) रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले.
- श्रीमंत माणसांना असते, पैशाची धुंदी, ( पतीचे नाव……) चे नाव घेण्याची, हि पहिलीच संधी.
- चंदेरी सागरात, रुपेरी लाटा, ( पतीचे नाव……) रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.
- हिरवं लिंबू गारसं, ( पतीचे नाव……) रावांच्या बाळाचं आज बारसं.
- प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,, ( पतीचे नाव……) सारखा हिरा.
- खुश ठेवा मला, नको माणिकमोती,, ( पतीचे नाव……) राव नेहमी ऱ्हावा, तुम्ही माझ्यासोबती.
हे सुद्धा वाचा:
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण
- मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
- विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
Marathi Ukhane For Female, बायकांचे उखाणे लग्नातील मराठी उखाणे Ukhane In Marathi, मराठी उखाणे नवरी साठी Ukhane In Marathi For Female, उखाणे मराठी नवरीचे Navriche Ukhane Marathi, लग्नाचे उखाणे Ukhane Marathi For Female
मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश Ukhane In Marathi For Female
- पहिल्या पावसात, मातीचा छान आला सुगंध, ( पतीचे नाव……) राव माझ्या आयुष्यात आल्याने, भेटला मला आनंद.
- आंबे वनात, कोकिळा गाते गोड, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, वैनी वाट माझी सोड.
- मोर आहे भारताचा, राष्ट्रीय पक्षी, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्षी.
- एकविरा आईच्या मंदिरात, नवसाच्या रांगा, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घ्यायला, मला केव्हाही सांगा.
- संध्याकाळची बत्ती लावायचा, टाईम असतो सात, ( पतीचे नाव……) रावांना देईल मी, जन्मो जन्माची साथ.
- दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य, ( पतीचे नाव……) रावांसारखे पती मिळाले, हेच माझे पुण्य.
- देवाला भक्त करतो, मनोभारे वंदन, ( पतीचे नाव……) मुळे झाले, संसाराचे नंदन.
- भाजीत भाजी, गवाराची, ( पतीचे नाव……) आहेत कदमांचे, आणि मी आहे पवारांची.
- गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ( पतीचे नाव……) रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
- ( पतीचे नाव……) रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा, त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.
- आई वडील, पहिले माझे गुरु, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेऊन, उखाणा करते सुरु.
विनोदी उखाणे Funny Ukhane In Marathi For Female
- साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा, ( पतीचे नाव……) राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.
- निवडणूक लढायला, आहेत खूप पक्ष, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्ष.
- चंदनी पानात मुग्ध कळी हसली, ( पतीचे नाव……) रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
- शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन, ( पतीचे नाव……)रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.
- तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी, ( पतीचे नाव……) रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
- नाही विचार केला, मी पाहिले न मागे, ( पतीचे नाव……) रावांसोबत जुळले माझे, आयुष्याचे धागे.
- लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती, ( पतीचे नाव……)रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.
- मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ( पतीचे नाव……) रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा.
- लग्नात हुंडा मागून, नाते करू नका घाण, ( पतीचे नाव……) रावांसारखे पती मिळाले, मला फार आहे त्यांचा अभिमान.
- सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
- असंख्य तारे, नभात पहावे निरखून, ( पतीचे नाव……) रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.
- पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला.
- छान वाजवतात , कार्यक्रमात हलगी, ( पतीचे नाव……) राव आहेत बिझनेसमन, आणि मी शेतकऱ्याची मुलगी.
- चुलीवरच्या जेवणाचा, आनंद असतो वेगळा, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवनात येऊन, आनंद भेटला सगळा.
- ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी , ( पतीचे नाव……)चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी .
- रत्नागिरीला आहे देवस्थान, गणपतीपुळे, कोकणामध्ये सासर भेटले , ( पतीचे नाव……) रावांमुळे.
- मुंबईला म्हणतात, स्वप्नांची नगरी,मी खुश आहे कारण मी पडली, ( पतीचे नाव……) रावांच्या पदरी.
- मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा, ( पतीचे नाव……)राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.
- मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती.
- गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र, ( पतीचे नाव……) रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.
- हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,मी आहे लंबू आणि , ( पतीचे नाव……) किती टिंगू.
- पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले, ( पतीचे नाव……) च नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.
- पैठणी साडी आहे, महाराष्ट्राची शान, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेताना, मला वाटतो अभिमान.
- कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण, ( पतीचे नाव……) रावांची आणि माझे जुळले, ३६ गुण.
हे सुद्धा वाचा:
Ukhane In Marathi For Female, सोपे उखाणे मराठी कॉमेडी Ukhane In Marathi For Female, Funny Marathi Ukhane विनोदी उखाणे, Satyanarayan Pooja Ukhane In Marathi सोपे उखाणे, Marathi Ukhane For Wife नावाचे उखाणे
नावाचे उखाणे सोपे Ukhane In Marathi For Female
- एका लग्न समारंभात, झाली आमची भेट, ( पतीचे नाव……) रावांनी २ महिन्यात, मला बायको बनवून घरी न्हेली थेट.
- आई वडील आहेत, मुलांची छाया, ( पतीचे नाव……) ला आहे, खूप माया.
- आई बाबा आहेत, सर्व प्रथम गुरु, ( पतीचे नाव……) रावांसोबत आजपासून, पुढचा प्रवास सुरु.
- स्वप्नात पहिले जे, ते रूप हेच होते, ( पतीचे नाव……) रावांचे नाव आज, सर्वांसमोर घेते.
- काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ( पतीचे नाव……)चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.
- मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी, ( पतीचे नाव……)नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी.
- डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले.
- कोकणचे समुद्र आहेत, निळे निळे गार, ( पतीचे नाव……) आहेत माझे, फेव्हरेट स्टार.
- कस्तुरीचा जन्म, सुगंधाकरिता,माझे जीवन अर्पण, ( पतीचे नाव……)रावांकरिता.
- दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, ( पतीचे नाव……)चे नाव घेते तुमच्या साठी.
- काचेच्या वाटीत, गाजराचा हलवा, ( पतीचे नाव……) रावांच नाव घेते, सर्वांना बोलवा.
चांगले उखाणे सोपे Ukhane In Marathi For Female
- शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी, ( पतीचे नाव……) चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.
- हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, ( पतीचे नाव……) मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
- चांदीच्या ताटात गाजराचा हलवा, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
- चांदीचे जोडवे पतीची खूण, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेते,… ची सून.
- परसात अंगण, अंगणात तुळस, ( पतीचे नाव……)नाव घ्यायचा मला नाही आळस.
- काचेच्या पेल्यात, सुख दुःखाचे पेय, ( पतीचे नाव……) रावांना कीर्ती मिळावी, हेच माझे ध्येय.
- आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार, ( पतीचे नाव……) रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार.
- श्रीविष्णूच्या मस्तकावर, सदैव असतो शेष, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.
- दिन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वराने ऐकावे, ( पतीचे नाव……) रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे.
- आयुष्यात सु:ख-दुःख, दोन्ही असावे, ( पतीचे नाव……) रावांचे प्रेम, माझ्यावर सदैव असावे.
- काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, ( पतीचे नाव……) च्या साह्याने सुखी झाले जीवन.
- बनारसी शालूला आहेत जरतारी काठ, ( पतीचे नाव……) च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
हे सुद्धा वाचा:
लिहिलेले उखाणे Marathi Ukhane For Female Romantic, चांगले उखाणे Ukhane For Female Romantic, नवरीचे उखाणे सोपे
सोपे उखाणे मराठी कॉमेडी Ukhane In Marathi For Female
- हिमालय पर्वतावर आहे, शंकर पार्वतीचा सहवास, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
- आहे मी एकुलती एक, नाही कधी वाईट केले कसले सेवन, ( पतीचे नाव……) तुमच्यासाठी शिकेन मी, बनवायला जेवण.
- वोटिंग करण्यासाठी, लाईन लागली क्रमाने, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
- चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र, ( पतीचे नाव……) रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र.
- माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, ( पतीचे नाव……) राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.
- दारावर लावले झेंडूचे तोरण , ( पतीचे नाव……)चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण .
- गेल्या त्या आठवणी , आणि गेले ते दिवस, ( पतीचे नाव……) आज आहे आपल्या आयुष्याचा, सुखाचा दिवस.
- मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर, ( पतीचे नाव……) …रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
- लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व.
- विवाहाच्या मंडपात, सुंदर फुलांचा थाट, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेऊन बांधते, वधू वराची गाठ.
- तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले, ( पतीचे नाव……)रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.
- मुंबई आहे सर्वांच्या, स्वप्नांची नगरी, मी सुखी आहे कारण, ( पतीचे नाव……) राव पडले माझ्या पदरी.
Funny Marathi Ukhane विनोदी उखाणे
- आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा, ( पतीचे नाव……)रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
- रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ( पतीचे नाव……) रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
- शब्द तिथे नाद, कवी तिथे कविता, ( पतीचे नाव……) रावांची जोड जणू, सागर आणि सरिता.
- गाव माझे सातारा, आणि जिल्हा आहे कराड, ( पतीचे नाव……) आपल्या लग्नात, खूप आहे व्हराड.
- झाली प्रभात..विहंग उडाले गात, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ.
- उंच मनोरे, नव्या जगाचे, ( पतीचे नाव……) रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.
- चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती , ( पतीचे नाव……)रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
- कोकिळाने लावला, झाडावर बसून सूर, ( पतीचे नाव……) रावांच्या आयुष्यात येऊदे, सुखाचा पूर.
- कृष्णा ने ठेवले गोकुळ खुश, वाजवून बासुरी, ( पतीचे नाव……) रावांच नाव घेऊन, आजपासून संसार सुरु सासरी.
- धरला यांनी हात वाटली मला भीती,हळूच म्हणाले , ( पतीचे नाव……) राव अशीच असते प्रीती.
- दूर डोंगरापल्याड, नदीकाठी माझे गाव, ( पतीचे नाव……) रावांना आवडले फार, म्ह्णून माझ्या पुढे त्यांचे लागले नाव.
- नवा रस्ता शोधू, हातात हात दे, ( पतीचे नाव……) मला अशीच, आयुष्यभर साथ दे.
हे सुद्धा वाचा:
Bride Ukhane Marathi, मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश Ukhane In Marathi For Female, विनोदी उखाणे Funny Ukhane In Marathi For Female,
Satyanarayan Pooja Ukhane In Marathi सोपे उखाणे
- वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते राखते तुमचा मान.
- आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे, ( पतीचे नाव……) रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.
- मंदिरात वाहते, फुल आणि पान, ( पतीचे नाव……) रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान
- शेल्या शेल्याची बांधली गाठ, ( पतीचे नाव……)नाव मला तोंडपाठ.
- गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध, ( पतीचे नाव……) रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.
- सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, ( पतीचे नाव……) रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.
- सोसायटी मध्ये बॅडमिंटन खेळताना, झाली होती सेटिंग, ( पतीचे नाव……) सोबत लग्नाची झाली, माझ्या घरी मीटिंग.
- आवडता ऋतू आहे, आमचा पाऊस, ( पतीचे नाव……) रावांना माझे नाव घेण्याची, खूप हाऊस.
- पहिल्या पावसाने, संपूर्ण निसर्ग होतो हिरवागार, ( पतीचे नाव……) रावांच्या नावाने घालते, गळ्यात मंगळसुत्रचा हार.
- आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ( पतीचे नाव……)चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
- पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक, ( पतीचे नाव……) आहेत आमचे फार नाजूक.
- सातारा म्हंटल कि, फेमस कंदी पेढे, ( पतीचे नाव……) राव झाले, कोल्हापूरच्या पोरी मागे वेडे.
Marathi Ukhane For Wife नावाचे उखाणे
- सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा, ( पतीचे नाव……) रावांमुळेच लागला मला, त्यांचा लळा.
- मंथरेमुळे घडले रामायण, ( पतीचे नाव……) चे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण.
- मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो , ( पतीचे नाव……) आणि माझी जोडी.
- लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र, ( पतीचे नाव……) चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
- आजच्या पूजेला फुलांच्या राशी, ( पतीचे नाव……) च नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी .
- आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर, ( पतीचे नाव……) याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
- देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले,खूप खुश आहे आज मी, कारण , ( पतीचे नाव……) सोबत माझे लग्न जुळाले.
- राज हंस पक्षी शोभा देतो वनाला, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.
- आंबा गोड, ऊस गोड,त्याहीपेक्षा अमृत गोड, ( पतीचे नाव……).चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
- शंकर पार्वतीचे, हिमालय आहे उगमस्थान, ( पतीचे नाव……) रावांचे नाव घेऊन, ठेवते सर्वांचा मान.
- अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, ( पतीचे नाव……) रावांच नांव घेताना, कसला आला आळस.
- हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, ( पतीचे नाव……) रावांचे चरण, हेच माझे चारही धाम.
- वाट जीवनाची झाली सुखद आनंदी, ( पतीचे नाव……) च्या सवे चालते मी सप्तपदी.
शेवटी आपल्याला (Ukhane In Marathi For Female लग्नातील उखाणे मराठी उखाणे) उखाणे कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा याशिवाय इतरही माहिती या ब्लॉगवर उपलब्ध आहे ते सुद्धा वाचा . यामध्ये आपल्याला आणखी माहिती आवशयक असल्यास तुम्ही आम्हाला कंमेंट द्वारे सांगा . किंवा आपण आम्हाला ई-मेल सुध्दा करू शकता. या भेट देत राहा धन्यवाद