सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Female

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Female Mahiti marathi सुंदर सोपे आणि छान नवरीचे उखाणे या ब्लॉगवर आपल्याला मिळणार आहे यामध्ये छान आणि सोपे उखाणेच आंम्ही लिहिलेले आहे.

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Female

संसाराच्या सारीपाटाची लागली मला चाहूल, (पतीचे नाव) रावांच्या आयुष्यात मी, आज टाकलं पहिलं पाऊल.

हल्लीच्या वातावरणात कधीही पडतो पाऊस, (पतीचे नाव) राव आहेत कम्प्युटर आणि मी त्यांची माऊस!

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, (पतीचे नाव) रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

आईची माया वडिलांची छाया, (पतीचे नाव) रावांचं नाव घेऊन पडते सर्वांच्या पाया

सुशील घरात जन्मले, कुलीन घराण्यात आले, (पतीचे नाव) रावांना हार घालून मी सौभाग्यवती झाले!

यमुनेच्या काठी कृष्ण वाजवी बासरी, (पतीचे नाव) रावांच्या साथीने सुखी मी सासरी.

विद्या शोभते बुद्धीने, लक्ष्मी शोभते धनाने, (पतीचे नाव) रावांच्या जीवावर संसार करते मानाने!

आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा, (पतीचे नाव) रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा.

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश, (पतीचे नाव) रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे नवरीचे Marathi Ukhane For Female

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

कुणाची करू नये निंदा कोणाला देऊ नये दूषण, (पतीचे नाव) राव हेच माझे भूषण

स्वामींच्या मंदिराला सोन्याचा कळस, (पतीचे नाव) रावांचं नाव घ्यायला मला मुळीच नाही आळस!

शिवसेनेच्या मेळ्यात नाही उखाण्याची आठवण, (पतीचे नाव)रावांच्या नावाची हृदयात साठवण

कामाची सुरवात होते श्रीगणेशापासून, (पतीचे नाव) रावांचे नाव घेण्यास सुरवात केली आजपासून.

कुंकू लावते ठसठशीत, हळद लाविते किंचित, (पतीचे नाव) रावांसारखे पती मिळाले हेच माझं पूर्व संचित !

चांदीच्या परातीत केशर चे पेढे, (पतीचे नाव) राव सोडून बाकी सगळे वेडे!

रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा, (पतीचे नाव) रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा..!!

रक्षण मातृभूमी र्वे करतो. फौजी माझा हौशी, (पतीचे नाव) चं नाव घेते सव्वीस जानेवारीच्या दिवशी.

बाप्पापुढे मांडले, प्रसादाचे ताट, (पतीचे नाव) रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट.

हे सुद्धा वाचा:

मराठी सोपे उखाणे Ukhane in Marathi

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

पौर्णिमेच्या चंद्राची उज्वल प्रभा, (पतीचे नाव) राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा!

सुशील माझ्या सासूबाई, प्रेमळ माझ्या वन्स, (पतीचे नाव) रावांचे नाव नाव घ्यायला असाच यावा लागतो चान्स!

शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता, (पतीचे नाव) सारखी राणी मिळाली स्वर्ग आला हाता.

एक निरंजन दोन वाती, एक ज्योती,(पतीचे नाव) राव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती!

संसाररूपी सागरात पती-पत्नीच्या नौका, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.

सौभाग्याचं कुंकू कपाळी सजलं, पत्नीच्या नात्यानं, (पतीचे नाव) रावांनां मनोमनी पुजल.

दत्ताला असे प्रिय गाय आणि महादेवाला नंदी, (पतीचे नाव) रावांच्या सोबतीने संसारात मी आहे आनंदी!

जेजुरीचा खन्डोबा तुळजापुरची भवानी, (पतीचे नाव) रावांची मी आहे अर्धागीनी..

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, (पतीचे नाव) रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

हे सुद्धा वाचा:

साधे सोपे उखाणे Ukhane Marathi for female

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

रामाचे होते राज्य म्हणून भरताने नाकारले, (पतीचे नाव) रावांच्या नावासाठी सौभाग्य पत्करले

कन्नड मुलींची कन्या शकुंतला, (पतीचे नाव)रावांचं नाव घेते (आडनाव) ची (स्वतःचे नाव)

नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद.

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप, (पतीचे नाव) रावां समवेत ओलांडते माप.

संसाररूपी करंडा, आनंदरुपी झाकण, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या आपण!

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर, (पतीचे नाव) रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

रामदासाचे दासबोध, तुकारामाची गाथा, (पतीचे नाव) रावांच्या चरणी ठेवते मी माथा!

यमुनेच्या जलावर पडेली ताजमहालाची सावली, (पतीचे नाव) रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

नीलवरणी अवकाशात शोभते चंद्राची कोर, (पतीचे नाव) रावांसारखे पती मिळायला भाग्य लागतं थोर!

हे सुद्धा वाचा:

नवरीचे उखाणे सोपे उखाणे Ukhane in Marathi for female

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

भाव तेथे शब्द शब्द तेथे कविता, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा करीता.

पंढरी आहे, विठू माऊलींचं स्थान, (पतीचे नाव) रावांना आहे, गावी खूपच मान.

वसंत ऋतुच्या पहाटे ऐकू येते कोकिळाचे मधुर कुंजन, (पतीचे नाव) रावांचा सहवास मिळवण्यासाठी केले मंगळागौरीचे पूजन..

पत्रिका जुळल्या योग आला जुळून,. (पतीचे नाव)रावांचं नाव घेते भाग्य थोर म्हणून.

चंद्र उगवला नभी, रजनीला लागली चाहूल, (पतीचे नाव) रावांच्या पहिलं घरात मी टाकते पाऊल.

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती, (पतीचे नाव) राव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती.

आई माते जोगेश्वरी वंदन करते तुला, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला!

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेढे, (पतीचे नाव) रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

पूजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, (पतीचे नाव) रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे लग्नातील उखाणे Marathi Ukhane list

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप, (पतीचे नाव) रावां समवेत ओलांडते माप.

जाई जुई चा हार गुंफित होता माळी,. (पतीचे नाव) रावांचं नाव घेते सायंकाळच्या वेळी

जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज, (पतीचे नाव) रावांच नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.

चांदीच्या ताटात सोन्याचा साज, (पतीचे नाव) रावचं माझे हृदय राज.

विष्णूला वाहिली तुळस, महादेवला वाहिला बेल, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते आता जेवायची झाली वेळ!

गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व, (पतीचे नाव) रावांची सेवा करणे हाच माझा धर्म!

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, (पतीचे नाव) रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती, (पतीचे नाव) वांचे नाव घेऊन करीन इच्छापूर्ती.

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, (पतीचे नाव) रावांचा नाव घेते सात जन्मासाठी.

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे मराठी Bride ukhane Marathi

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्रांचा दिवा, (पतीचे नाव) रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा!

मंगळसूत्राच्या दोन वाटी सासर आणि माहेर,(पतीचे नाव) रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर!

बाप्पापुढे मांडले, प्रसादाचे ताट, (पतीचे नाव) रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट.

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, (पतीचे नाव) रावांचं नाव माझ्या मनात कोरलं!

जेजुरीचा खन्डोबा, तुळजापुरची भवानी, (पतीचे नाव) रावांची आहे मी अर्धांगिनी

लाल मणी तोडले काळे मणी जोडले, (पतीचे नाव) रावांसाठी मी माहेर सोडले..

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, (पतीचे नाव) रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

दिलीप राजाने केले यज्ञात सर्वस्व दान, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते आग्रहाने देऊन मान

रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते असु द्या लक्षात

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Female

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा, (पतीचे नाव) रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा.

सागरा तू करुणेचा देव, मनातलं सारं काही तुला सांगावं,. (पतीचे नाव) रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य मला द्यावं

लाल लाल साडीवर टिकली आणि नक्षी वर्क,आमचे (पतीचे नाव) राव सदानकदा कामातच गर्क!

ब्रह्मा विष्णू महेश तिने देव देत आहे आशीर्वाद साक्षात, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात

सासरचे निरंजन माहेरची फुलवात, (पतीचे नाव) रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात!

कानातल्या झुमक्याला मोती लावले शंभर., (पतीचे नाव) राव आहेत लाखात एक नंबर..

नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा, (पतीचे नाव) रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा.

काचेच्या ग्लासात लाल लाल सरबत, (पतीचे नाव) राव जातात ऑफिसला पण मला नाही करमत!

जाई जुईच्या बागेत काचेचा बंगला, (पतीचे नाव) रावांच्या संसारात जीव माझा रमला

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Female

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

पैठणीवर शोभते मोरांची जोडी, (पतीचे नाव) रावांमुळे आहे माझ्या संसाराला गोडी!

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडल्या माथी, (पतीचे नाव) राव आता माझे जीवन साथी!

एक होती चिऊ, एक होता काऊ, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते तुम्ही डोकं नका खाऊ!

चंद्राच्या शीतल प्रकाशात मंद हास्य करिते रोहिणी, (पतीचे नाव) रावांच्या सहवासात होईल मी आदर्श गृहिणी

ज्योतीला मिळाली ज्योत आता वाढेल प्रकाश (पतीचे नाव) रावांच्या सहवासात मला ठेंगणे झाले आकाश

महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस, (पतीचे नाव) राव माझे वृंदावन, मी त्यांची तुळस

नको मोहन माळ, नको मला हिऱ्याचा हार, (पतीचे नाव) रावांच्या संसारात मी सुखी आहे फार!

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,(पतीचे नाव) चे नाव घेते सात जन्मांसाठी!

एक तीळ सातजण खाई, (पतीचे नाव) रावांना जन्म देणारी धन्य ती आई.

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Female

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

पांडुरंगाच्या मंदिरात हरिनामाचा गजर, (पतीचे नाव) रावांचं नाव घ्यायला मी नेहमीच असते हजर!

बेरीज केली, वजाबाकी केली बाकी उरली शून्य, (पतीचे नाव) रावांसारखे पती मिळाले हेच गेल्या जन्मीचे पुण्य !

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते तुमच्या साठी.

चांदीच्या ताटात बदामी हलवा, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा!

निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे,नाव घेते (पतीचे नाव) रावांचे लक्ष द्या सारे!

काचेच्या बशीत आंबे ठेवले कापुन, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन..!!

पुण्याहून आणले मोती मुंबईला केला साज, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते लग्न जमले आज

महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून!

साजूक तुपात नाजूक चमचा, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते, आशीर्वाद असु दे तुमचा.

हे सुद्धा वाचा:

नवीन उखाणे सोपे उखाणे नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Female

हिरव्या हिरव्या साडीला काठ आहे जरतारी, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते शालू नेसून भरजारी!

दही, दूध, तूप आणि लोणी, (पतीचे नाव)राव राजा आणि मी त्यांची राणी!

तिरंगी झेंडयाला वंदन करते वाकून, (पतीचे नाव) रावांच नाव घेते तुमचा मान राखून..

जगात नाही एकलव्यासारखा शिष्य, (पतीचे नाव) रावांना मागते शंभर वर्ष आयुष्य!

जाई जुईच्या झाडाखाली फुले वेचीते वाकून, (पतीचे नाव) रावांचे नाव नाव घेते सर्वांचा मान राखून!

श्रीकृष्णाच्या प्रीतीने रुक्मिणीला केले वेडे, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते मंगळागौरी पुढे

आईने शिकली ममता वडिलांनी दिले शिक्षण, (पतीचे नाव) रावांची विद्या हेच माझे भूषण

एका वर्षात महिने असतात बारा, (पतीचे नाव) रावांच्या नावातच माझा आनंद सामावला सारा !

गोकुळाचा संसार, सारेच आहेत हौशी,(पतीचे नाव) रावांचं नाव घेते मी लग्नाच्या दिवशी!

हे सुद्धा वाचा:

नावाचे उखाणे सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे

सोपे उखाणे मराठी नवरीचे उखाणे  Marathi Ukhane For Female

महादेवाच्या पिंडीवर खरबुजाची फोड, (पतीचे नाव) रावांचे बोलणे साखरेपेक्षाही गोड!

नीलवर्णी आकाशात चंद्र दिसतो साजरा, (पतीचे नाव) रावांनी मला सौभाग्याचा गजरा

घराला असावे अंगण अंगणात असावी तुळस (पतीचे नाव) रावांचे नाव घ्यायला मला नाही बाई आळस!

नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचं,(पतीचे नाव) रावांना शेवटी अहोच म्हणायचं!

“माहेरच्या” अंगणात वाढली ही संस्काराची तुळस, (पतीचे नाव) रावांचे नाव घेत मी गाठीन मानाचा कळस.

विवाह प्रसंगी बांधल्या जातात रेशमाच्या गाठी,(पतीचे नाव) रावांचं नाव घेते फक्त तुमच्यासाठी

आई बाबा आशीर्वाद द्यावा, (पतीचे नाव) रावांचा सहवास मला जन्मभर लाभावा

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल, (पतीचे नाव) रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिलं पाऊल.

मराठी भाषेत प्रसिद्ध आहेत अलंकार उपमा व उत्प्रेक्षा, (पतीचे नाव) राव सुखी राहो हीच माझी अपेक्षा

हे सुद्धा वाचा:

चांगले सोपे नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Female

वर्तमानपत्रात छापून आली वार्ता, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते फक्त तुमच्याकरता

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले, (पतीचे नाव) रावांचे हेच रुप मला फार आवडले.

पौर्णिमेच्या चंद्रभोवती चांदण्याची दाटी, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी!

मोत्याचे मनी घरभर पसरले, (पतीचे नाव) रावांसाठी मी माहेर विसरले!

माहेर सोडताना डोळे झाले ओले, (पतीचे नाव) रावांच्या संसारात अश्रूंची झाली फुले!

यशाच्या शिखर काढण्यासाठी तुडवावी लागते खडतर वाट, (पतीचे नाव) रावांचं नाव घेऊन सोडते मी गाठ

चांदीची जोडवी लग्नाची खूण, रावांचे नाव घेते, (पतीचे नाव) ची सून.

लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र, (पतीचे नाव) चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.

पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन, (पतीचे नाव) रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.

हे सुद्धा वाचा:

सुंदर सोपे उखाणे सोपे नवरीचे उखाणे Ukhane For Female

चांदीच्या वाटीत ठेवले होते काजू, (पतीचे नाव) रावांचं नाव घ्यायला मी का लाजू!

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, (पतीचे नाव) रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,रावांचे नाव घेते, (पतीचे नाव) च्या लग्नाच्या दिवशी

“मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, (पतीचे नाव) चे बरोबर बांधली जीवनाची गाठ”.

रामासारखे पती, लक्ष्मणासारखे भाऊजी, (पतीचे नाव) रावांसह संसारात नाही कशाची काळजी!

पूजेचा प्रसाद बनवला होता तूपात, (पतीचे नाव) आणि मी नेहमी राहू सोबत एकमेकांच्या सुखदुःखात.

आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा, (पतीचे नाव) राव माझे पती हाच भाग्योदय खरा

पिकल्या पानाच्या विड्यात बदाम घालते किसून, (पतीचे नाव) रावांना विडा देते पलंगावर बसून

गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी, (पतीचे नाव) रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

अनंत अवकाशात विहारत होते पक्षी, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते तुमच्यासह चंद्रसूर्य साक्षी !

हे सुद्धा वाचा:

नवरीचे उखाणे सोपे उखाणे Marathi Ukhane For Female

हिरव्या साडीला जरीचा काठ, (पतीचे नाव) रावांसोबत बांधली मी संसाराची गाठ!

स्वामींच्या मंदिरात उदबत्तीचा वास, (पतीचे नाव) रावांना भरविते पेढ्याचा घास!

गणरायाला दुर्गा वाहते वाकून, (पतीचे नाव) रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून !

जाई जुईच्या झाडाखाली हरणी घेते विसावा, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असावा!

मातीत माती, माझ्या गावातली माती, (पतीचे नाव) रावांच्या नावाचं, कुंकू लावलंय माथी.

असंख्य तारे नभात पहावे निरखून, (पतीचे नाव) रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून!

तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस, (पतीचे नाव) राव हीच माझी पहिली चॉईस!

दही, दूध, तूप आणि लोणी, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते मी त्यांची राणी.

महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकुन, (पतीचे नाव) रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन.

शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात, (पतीचे नाव) रावांचे नाव घेऊन टाकते पहिले पाऊल घरात.

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला , (पतीचे नाव) रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला.

हे सुद्धा वाचा:

Leave a Comment